Please Select Your Location

0 Items

चंदनकन्या योजना

"पहिली बेटी धन कि पेटी , दुसरी बेटी तूप कि रोटी " असे सांगून येणाऱ्या लेकीचे स्वागत करणारी आपली संस्कृती आहे. याच विचारला अनुसरून महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने चंदन कन्या योजना राबवण्याचे ठरवले आहे. भारतात चंदनाला सोन्याएवढे महत्व असताना व आंतराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार सुगंध व सर्वोच्च प्रतीच्या चंदन तेला मुळे भारतीय चंदनाला आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वोच बाजार भाव मिळतो. तरीही आपल्या देशात चंदन लागवड म्हणजे बेकायदेशीर आहे असा खूप शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. चंदन लागवड करणे व त्याची तोडणी करून विक्री करणे संपूर्णतः कायदेशीर आहे. माघील काही वर्षांपासून खूप शेतकरी चंदन लागवड व्यापारी शेती म्हणून करत आहेत. पण चोरीची भीती, विक्री कोठे करायची किंवा कमी जमीन क्षेत्र असणे यामुळे खूप अल्पभूधारक शेतकरी या लागवडीपासून दूर राहत आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करून चंदन कन्या योजना आपल्या महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने राबवण्याचे निश्चित केले. या योजनेत सहभागी होण्यार्या शेतकर्यांना या बांधावरती लागवड केलेल्या चंदन झाडे मुलगी जशी मोठी होईल तसेच हे चंदन वृक्ष मोठे होतील व त्याचे उत्पन्न हे मुलीचे शिक्षण, लग्न ई. पैश्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या ठिकाणी वापरण्यासाठी खूप मह्तवपूर्ण ठरणार आहे. आता लावलेली झाडे तुमच्या मुलीच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने चंदनाचा सुगंध दरवळण्यास महत्वपूर्ण योगदान देणार आहेत.

याचबरोबर वाढत्या तापमानवाढीचे धोके कमी करणे व भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरण हाती देण्याचा प्रयत्न हि यातून आपल्या व आपल्या मुलीच्या हातून पूर्णत्वाला जाईल. आपल्या मुलीचे शिक्षण, लग्न ई.साठी आर्थिक नियोजन व त्याचबरोबर पर्यावरण रक्षण हे दुहेरी हेतू साध्य करने या चंदन कन्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने चंदन कन्या योजनेच्या रूपाने लोकसहभागातून हि मोठी चळवळ उभी केली आहे.

(मुल्य) Values

© 2018-2019 Chandankanya. All rights reserved | Design by Synnex Softech.